घाटी रुग्णालयाच्या चौथ्या माजल्यावरून पडून मृत्यू

Foto
घाटी रुग्णालयातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका 46 वर्षीय व्यक्‍तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली.काका कणसे (वय-46, रा. धनगाव ता.पैठण) असे मृत्यू पावलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.
या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी, कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. माजी आमदार संजय वाघचौरे यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. आज सकाळी घाटी रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कणसे हे गेले होते. तेथून ते खाली पडल्याने डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब माहिती होताच बेगमपुरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत कणसे यांना घाटीत हलविले मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. कणसे हे अपघाताने खाली पडले की मग त्यांनी आत्महत्या केली हे दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker